बीड-धारूर मार्गावर प्रवासादरम्यान पुन्हा एकदा त्याच बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. या वेळी बस चालक शेख यांनी तत्काळ सावधानता बाळगत बस रस्त्याच्या कडेला थांबवली, ज्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. एकाच नादुरुस्त बसला पुन्हा प्रवासासाठी का सोडण्यात आले? प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वर्कशॉपमधील वाहन तपासणी आणि दुरुस्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.