अमरावती: अमरावती पोलिसांकडून एक पेड माँ के नाम अंतर्गत विद्यार्थ्यांना 100 रोपट्यांचे वाटप, बडनेरा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
एक पेड माँ के नाम या मोहिमेला शासन स्तरावर विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील बडनेरा पोलिसांच्या वतीने सुद्धा या मोहिमे अंतर्गत बडनेरा येथील आर डी आय के महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना 100 वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती तसेच झाडे लावा, झाडे जगवा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बडनेरा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.