कोरेगाव: कोरेगावात परप्रांतीय तीन चोरट्यांनी सराफी दुकान फोडण्याचा केला प्रयत्न; तिघांना शिताफीने केली अटक
कोरेगाव शहरात मेन रोडवर भारतीय स्टेट बँक आणि आयडीबीआय बँकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भुतडा कॉम्प्लेक्समध्ये सुशील ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न रविवारी पहाटे तीन परप्रांतीय चोरट्यांनी केला, मात्र एका जागरूक व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न पूर्णपणे फसला. पोलिसांनी गतिमान हालचाल करत तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यापैकी दोघांना अटक केली आहे. एक विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातून सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली.