दिग्रस: दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांची अचानक बदली, मंत्रालयातून आदेश धडकला
दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अतुल पंत यांच्या बदलीचा आदेश आज दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मंत्रालयातून धडकला. या अचानक आलेल्या आदेशामुळे नगर परिषदेत आणि शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मागील वर्षी माधुरी मडावी यांच्या बदलीनंतर अतुल पंत यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, त्यांच्या बदलीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.