चांदूर रेल्वे: चांदूरवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक पोलीस दिलीप सावंत यांचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुऱ्हा पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असणारे दिलीप सावंत हे दुचाकीने गावाकडे परत चांदूर येथे जात असताना चांदुरवाडी नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दिलीप सावंत यांचा अपघात झाला. त्यांना अमरावती येथे उपचारासाठी खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले. परंतु पहाटेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिलीप सावंत यांच्या मृत्यूने पोलीस दलात व परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.