पालघर: टँकरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; विरार येथील घटना
विरार येथील चंदनसार परिसरात दुचाकी आणि टँकरचा भीषण असा अपघात घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह खाली पडले. यावेळी मागून आलेल्या टँकरच्या चाखाखाली चिरडल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. प्रताप नाईक असे मृत दुचाकी स्वराचे नाव आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.