अकोट: आकोट को-ऑप.जिनिंग ॲन्ड प्रेसिंग फॅक्टरीची आमसभा संस्थेच्या प्रांगणात उत्साहात पार पडली.
Akot, Akola | Sep 15, 2025 आमसभेला जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर व हिदायत पटेल, कृउबासचे सभापती प्रशांत पाचडे,जिंनिंगचे उपाध्यक्ष रामदास थारकर,खविसचे उपाध्यक्ष शेषराव पा. वसू,कृउबासचे उपसभापती अतुल खोटरे ,आदी मान्यवर उपस्थित होते.सभेत विषय पत्रिकेतील विषयावर चर्चा पार पडली.संस्थेच्या आर्थिक पत्रके,ताळेबंद व नफातोटा पत्रकांना सभेने एक मताने मंजूर दिली.आर्थिंक पत्रक व्यवस्थापक राजेश सांगोला यांनी सादर केलीत.आमसभेला संस्थेचे संचालक भागधारक सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते