सेनगाव: हरभऱ्यावरील मर रोगाने शेतकरी चिंतेत,कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी ,शिंदेफळ सह विविध परिसरामध्ये हरभरा पिकावरील मर रोगाने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे तात्काळ कृषी विभागांनी मार्गदर्शन करण्याची मागणी आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शेतकऱ्यांच्या वतीने कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.