अकोल्यातील महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्डलाईन व इतर पथकांनी एका 14 वर्षीय बालिकेचा होऊ घातलेला विवाह रोखण्यात यश मिळवले. संबंधित पथकाने गावात भेट देऊन पालकांना दिनांक 24 नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली व बालकल्याण समितीसमोर दोन्ही कुटुंबांची बैठक घेऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची माहिती दिली. बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्र घेण्यात आले. या मोहिमेत समिती सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.अशी माहिती