गडचिरोली: नागेपल्ली येथील स्मशानभूमीत अंत्यविधीवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील अहेरी -अल्लापल्ली मार्गावर आयटीआय च्या लगत आरक्षित स्मशानभूमीत पुन्हा एकदा डुक्करपालकांनी अतिक्रमण केल्याने ग्रामस्थांचा रोष उसळला असून अंत्यविधीच्या वेळीच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ग्रामपंचायतीने सुमारे वर्षभरापूर्वी स्मशानभूमीवरील बेकायदेशीर डुक्करपालन हटवले होते. मात्र, डुक्करपालकांनी पुन्हा त्याच ठिकाणी कब्जा केला होता.