नांदेड: नांदेडमध्ये साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या पूर्व नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न
Nanded, Nanded | Oct 7, 2025 स्वायत संस्था आर्टी आयोजित साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन दि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे नगरी, डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परीसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे, हा कार्यक्रम एक दिवसीय असून सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली आज ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सव्वापाच पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली आहे.