वरोरा: अखेर ५ वर्षाची प्रतीक्षा संपूर्ण टाकीवरून वरोरा शहरात पाणीपुरवठा सुरू
सामाजिक कार्यकर्ता छोटू शेख यांच्या पाठपुरावाला यश
आज दि. २१ सप्टेंबर सकाळी ८ वाजता टाकीवरील वालचे पूजन व पुष्पगुच्छ अर्पण करून शहरात काही प्रमाणात नदीतील पाणीपुरवठा वाल खोलून पाणी पुरवठा माजी पाणीपुरवठा सभापती तथा सामाजिक कार्यकर्ता शेख जैरुदीन छोटूभाई यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रा.प्रवीण खिरटकर, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रा कावळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पराते गुरुजी, बाळू जीवने,आदींसह उपस्थित होते.