वर्धा: संस्कृती वाचली तरच देश वाचेल स्वामी जितेंद्रनाथ महाराजच्या हस्ते गोशाळेचे लोकार्पण;श्री कृष्णगिरी महाराज पुण्यतिथी उत्सव
Wardha, Wardha | Jan 21, 2026 वर्धा जिल्ह्यातील धोत्रा रेल्वे येथे नुकताच सद्गुरू परमहंस श्री कृष्णगिरी महाराज वार्षिक पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्रीनाथपीठाचे स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी उपस्थित भाविकांना मौलिक मार्गदर्शन करत पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली असल्याचे आज 21जानेवारी रोजी रात्री 10 वाजता प्रसिद्धीस दिले