चांदूर रेल्वे: कुऱ्हा पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या महिलेचा विनयभंग; युवकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
कुऱ्हा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेने महेश रामराव जाधव वय वर्ष 26 राहणार कारला याच्या विरोधात कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे. महेश याने मोटरसायकलने सदर महिलेचा पाठलाग करून ,तू मला आवडते असे म्हटले व हात पकडण्याचा प्रयत्न केला तसेच मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे. तेव्हा विविध कलमाने महेश विरोधात कुऱ्हा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.