हातकणंगले: मुसळधार पावसाने ग्रामीण भागात हाहाकार, ऊसाची कोवळी रोपे पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान
शनिवारी रात्री झालेल्या अचानक पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला,तरी त्याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने थोडा आनंद मिळाला असला,तरी आज रविवारी दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत पडलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागात हाहाकार माजवला.दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड, नवे दानवाड, जुने दानवाड आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.