अंजनगाव सुर्जी: येवदा येथे भांडणात एक जखमी; दुकानात खरेदीवरून वाद होऊन हाणामारी
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास येवदा येथील एका दुकानात खरेदीवरून वाद होऊन झालेल्या भांडणात एक व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी राहुल देविदास सोलंके वय ४०,हे काळपांडे यांच्या दुकानात पुडी घेण्यासाठी गेले असता आरोपी तेथे आले.किरकोळ कारणावरून आरोपी सेवकराम उत्तमराव सोळंके,उमेश चव्हाण यांनी फिर्यादीच्या कानावर व हातावर मारहाण केली.