लोखंड व्यापारी चंद्रशेखर प्रजापती यांनी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील सी आर एस शिक्षण मध्ये 85 लाख रुपयांचे दुकान शेडसहित खरेदी करण्यासाठी जागा मालक गोपीचंद कोतवाणी यांच्यासोबत 31 जानेवारी 2018 ला सौदा केला होता. दरम्यान 25 मे 2020 रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपी संतोष शाहू व राजदीप शाहू यांनी या व्यवहारातून शिवीगाळ करून बंदुकीचा धाक दाखवून 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.