मराठा आरक्षण रद्द होण्याच्या भेटीने वरवटी येथे पुन्हा एकदा एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
Beed, Beed | Oct 19, 2025 मराठा समाजाला मिळालेले कुणबी आरक्षण रद्द होईल की काय, या भीतीने बीड तालुक्यातील वरवटी येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विष्णु (शाम) परमेश्वर कोटुळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन शासनाने दिलेल्या आरक्षणावर नुकत्याच झालेल्या ओबीसींच्या मेळाव्यातून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच नैराश्यातून विष्णु कोटुळे याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.