🚨 इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीवर विश्वास ठेवणे एका पोलीस पाटलाला तब्बल ₹56.25 लाखांना महागात पडले!
पुण्यातील मुळशी येथील पोलीस पाटील ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडले. स्वतःला 'सिया' म्हणवणाऱ्या महिलेने बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे आधी मोठा नफा दाखवला, नंतर लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली. ॲपमध्ये ₹10.90 कोटींचा बनावट पोर्टफोलिओ दाखवण्यात आला. पैसे काढण्याचा प्रयत्न करताच आणखी ₹30 लाख सिक्युरिटी डिपॉझिट मागितल्याने फसवणूक उघड झाली.
📍 पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
⚠️ सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवू नका. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत पडताळणी करा.
👉 अशा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा.
#Pune #PuneNews #Mulshi #Maharashtra #MaharashtraNews #BreakingNews #CyberCrime #OnlineScam #InvestmentScam #StockMarketScam #InstagramScam #CyberFraud #DigitalFraud #FinancialFraud #Police #CrimeNews #MarathiNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #ScamAlert
Pune City, Pune | Jul 29, 2026