जालना: फुटलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी बाधित शेतकर्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु
Jalna, Jalna | May 14, 2026 मानेगाव जहागीर येथील गट क्रमांक 60, 61 आणि 62 परिसरातील दोन वर्षांपासून फुटलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत पाझर तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने संतप्त शेतकर्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तलावाची तात्काळ दुरुस्ती न झाल्याने जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरु केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा जलसंधारण विभागाकडे अनेकदा लेखी अर्ज व निवेदने दिले.