अकोला जिल्ह्यात पाच नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 14 तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या 95 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली, आता नगराध्यक्षसाठी 41 तर सदस्यत्वासाठी 717 नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. थेट नगराध्यक्ष जनतेतून निवड होत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे.