दिग्रस: दारव्हा न्यायालयाचा मोठा निर्णय, दिग्रस निवडणुकीत आज प्रभाग क्रमांक १० च्या उमेदवार तब्बू नौरंगाबादे यांचे अर्ज मंजूर
दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत कागदपत्रातील त्रुटींचा दाखला देत 61 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले होते. त्यातील चार उमेदवारांनी दारव्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी तिघांचे तर आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान प्रभाग क्रमांक १० चे अपक्ष उमेदवार तब्बू नौरंगाबादे यांचा अर्जही न्यायालयाने मंजूर केला आहे. या न्यायालयीन निर्णयांमुळे दिग्रस नगर परिषद निवडणूक अधिकच रंगतदार आहे.