अकोला : महावितरणकडून ११ केव्ही राजपुतपुरा फिडरची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असल्याने उद्या बुधवार (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत फिडर बंद राहणार आहे. त्यामुळे राजपुतपुरा, वसंत टॉकीज परिसर, खिडकीपुरा, वर्धमान भवन, किल्ला चौक, जय हिंद चौक, रामनगर व काळा मारूती परिसराचा वीज पुरवठा बंद राहील. अखंडित व दर्जेदार वीजसेवेसाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने दिनांक 25नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे केले आहे.