पालम: लेंडी नदीला पूर ; पालम लोहा रस्ता वाहतुकीसाठी बंद
Palam, Parbhani | Sep 27, 2025 काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असल्याने पालम तालुक्यातील पेठशिवनी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीला पूर आला असून, त्यामुळे नदीपात्राजवळील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्याने पालम ते लोहा रस्ता आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी सकाळपासून वाहतुकीसाठी बंद आहे. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये अश्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.