एरंडा गावात साथरोग व कंटेनर सर्वेक्षण
2.8k views | Malegaon, Washim | Sep 10, 2025 वाशिम (दि.१० सप्टेंबर, २०२५) : प्रा.आ. केंद्र किन्हीराजा व उपकेंद्र गिव्हा कुटे अंतर्गत एरंडा गावात आज साथरोग सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान डास आळी आढळून आलेले कंटेनर तात्काळ टेमीफॉस टाकून रिकामे करण्यात आले. सर्वेक्षणात संशयित कुष्ठरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच थंडी-तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेऊन रॅपिड टेस्ट करण्यात आली. या उपक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. डौलसे, आरोग्य सेवक आर. व्ही. फड, सचिन खिलारी, आरोग्य सेविका वंदना खुळे तसेच आशा स्वयंसेविका यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.