सातारा: साताऱ्यातील संगम माहुली येथे दीपोत्सवाचा जल्लोष
Satara, Satara | Nov 5, 2025 सातारा : संगम माहुली येथील घाटावर ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण घाट परिसर उजळून निघाला. यावेळी नागरिकांनी नदीमध्ये दीप सोडत मनोभावे पूजा-अर्चा केली.या सोहळ्यादरम्यान परिसरात धार्मिक गीतांच्या सुरावटींनी आणि जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले होते. ग्रामस्थांसोबतच परिसरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक रितीने साजरा झालेल्या या दीपोत्सवामुळे संगम माहुली घाट परिसरात उजळून निघाला