नायगाव-खैरगाव: नायगाव तालुक्यातील नरसी येथील ढगफुटी दृश्य पाऊस, नरसी येथील नागरिकांची उडाली तारांबळ
आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान नरसी येथे ढगफुटी दृश्य पाऊस जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले. नरसी येथे अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून तेथील नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. नांदेड शहरात देखील मुसळधार पाऊस बरसला. प्रादेशिक हवामानशास्त्र मुंबई यांनी आणखी दोन दिवस नांदेड जिल्ह्यात यल्लो अलर्ट जाहीर केला आहे.