पनवेल महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपा महायुतीला भरघोस आशीर्वाद देणाऱ्या सर्व पनवेलकरांचे मनस्वी आभार मानतो. आणि जनतेने महायुतीला दिलेला कौल हा शहराच्या विकासाची नांदी असून, याकरिता पनवेलकरांच्या पुढे कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतो. धन्यवाद पनवेलकर! असे देखील आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.