राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दि.१९ नोव्हेंबर ला ५ वाजता ला चिंचोली (खुर्द) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आणि माजी जि.प.सभापती सुनील उरकुडे यांचे नेतृत्वात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले.