साकोली: विर्सी येथील श्रीदत्त मंदिरात दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीमदभागवत कथा सप्ताहाचे आयोजन
साकोली तालुक्यातील विर्सीतील दत्त मंदिरात दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीमदभागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त परायण गुरुवर्य बांगरे महाराज यांनी बुधवार दि.3 डिसेंबरला दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे निमित्ताने भाविकांना,भोजनाने क्षणीक तर भजनाने चिरकाल आत्मिक तृप्ती मिळते असे प्रतिपादन केले.दि.4ला श्री दत्त जयंती महोत्सव व हवन व 5डिसेंबरला काला व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे