लाखनी तालुक्यातील NH-53 रोडवरील मानेगाव / सडक येथील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ दिनांक ०९/१२/२०२५ रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या दरम्यान छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलीस स्टेशन, डोंगरगड येथील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी रामनारायण बघेल (वय ४१) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्कार्पिओ (क्र. CG-08 BB-1510) वाहनाला मागून येणाऱ्या ट्रक (क्र. CG-08 AY-7707) निष्काळजीपणे धडक दिली. डोंगरगड येथील एका गुन्ह्याच्या तपासासाठी स्कार्पिओ नागपूरच्या मेयो हॉस्पिटलकडे जात असताना हा अपघात झाला.