उरण: आमदार महेश बालदी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत उरण रेल्वे स्टेशनची केली पाहणी
Uran, Raigad | Oct 11, 2025 आमदार महेश बालदी यांनी आज शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांसोबत उरण रेल्वे स्टेशनची पाहणी करून येथील विविध समस्यांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना स्थानक परिसरातील सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्यात याव्यात आणि प्रवाशांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले. दरम्यान, बेलापूर–नेरूळ ते उरण रेल्वे मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी यापूर्वीच रेल्वे मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत, रेल्वे प्रशासनाने लवकरच अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.