पाचोरा: बाळद बु. शेत शिवारातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुडुंब, फक्त 20% पंचनामे, शेतकरी अद्यापही पंचनामाच्या प्रतीक्षेतच
पाचोरा तालुक्यातील बाळद बु. येथे दि 27 सप्टेंबर रोजी देखील शेत शिवारातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुडुंब भरलेले आहे, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असून आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी पर्यंत या शेत शिवारातील तुरळक फक्त 20 टक्क च शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून अद्याप पर्यंत उर्वरित ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे अद्यापही झाले नसल्याचा आरोप करत पंचनामे झालेच नसल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल कशी असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्तित केला आहे,