नागपूर ग्रामीण: गोंदिया येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ११ गोवंशियांची सुटका; बजरंग दल ने पाठलाग करून पकडले वाहन
पांजरी टोल नाका परिसरात सापळा रचून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ११ जिवंत गोवंशियांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकसह ११ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी पहाटे अडीच च्या सुमारास एका आयशर ट्रकमधून गोवंशियांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक केली जात होती. पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता, त्यात चारा-पाण्याविना कोंडलेले ११ गोवंश आढळले.