मोहाडी: कांद्री ते रामटेक रस्त्यावर भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी, टिप्परचालकाविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील कांद्री ते रामटेक रस्त्यावर भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 21 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी 3 वा.च्या सुमारास घडली. यातील जखमी फिर्यादी अमोल पाटणकर हा आपल्या दुचाकीने नागपूरकडे जात असताना समोरून येणारा टिप्पर चालक आशिष चतुर्वेदी यांनी आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.यावेळी जखमी फिर्यादीच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.