अंजनगाव सुर्जी: दिवाळीपूर्वी राष्ट्रसंत रूपलाल महाराज स्मारक भूमिपूजन व्हावे;बारी समाजाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
अंजनगाव सुर्जी येथे मंजूर झालेल्या राष्ट्रसंत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे,अशी मागणी आज १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता बारी समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. स्मारकासाठी आराखडा शासनाकडे पाठविला असून काम संथगतीने सुरू आहे.या कामाला गती मिळावी आणि दिवाळीपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली