भोकर: थेरबन शिवारात कौटुंबिक त्रासाला कंटाळून सख्या भावाने केला दुसऱ्या भावाच्या खुनाचा प्रयत्न, भोकर पोलिसात गुन्हा नोंद
Bhokar, Nanded | Oct 1, 2025 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास भोकर तालुक्यातील थेरबन शेत शिवारामध्ये बळीराम बालाजी उपलवार व पंडित मारुती राजुरे यांनी संगनमत करून सुरेश बालाजी उपलवार हा नेहमी दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने घरच्या कुटुंबीयांसह गावातील लोकांना त्रास देत असल्याने त्यास कंटाळून त्याच्या गळ्यातील दस्तीने त्याचा गळा आवळून डोक्याला व डाव्या हातावर मारून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी फिर्यादी पंडित अवधूतराव हाके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोकर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.