परभणी: मुसळधार पावसाने आर्वी कुंभारी वाडी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला
परभणी तालुक्यातील आर्वी कुंभारी वाडी हे गाव मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. वाढलेल्या पाण्यामुळे आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून गावाचा परभणी जिल्ह्याशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. या परिस्थितीत गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाच्या मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.