वर्धा: भाजपचे भव्य शक्ती प्रदर्शन; देवळीत शोभा रामदास तडस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अर्ज केला दाखल
Wardha, Wardha | Nov 16, 2025 देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीला वेग आला असून आज भाजपकडून भव्य शक्ती प्रदर्शनात नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपच्या शोभा तडस या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असून त्या माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी आहेत. मागील अनेक वर्षांपासून या नगरपालिकेवर रामदास तडस यांची सत्ता असून यंदाही भाजप आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरल्याचे दिसले.