भोकरदन: पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी हजर नसतानाचा पंखे सुरू असल्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद
आज दिनांक 9 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात पंचायत समिती कार्यालय येथे घरकुल विभागात कर्मचारी त्यांच्या दालनात व खुर्चीवर हजर नसताना 4 ते 5विद्युत पंखे सुरू असल्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा एका सूज्ञ नागरिकाने कैद केला आहे व तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, या व्हिडिओवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत अगोदरच या कार्यालयात नागरिकांची कामे होत नाही आणि त्यात कर्मचारी वीज बिलाचा भार सरकारवर टाकत असल्याने नाराजी व्यक्त केली.