नागपूर ग्रामीण: बोखारा येथे सिलेंडर वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण; कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी
बोखारा परिसरात गॅस सिलेंडर वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका इसमाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.