खुलताबाद शहरातील जुनाबसस्थानक ते नगारखाना गेट या मार्गावर जागोजागी टाकण्यात आलेले अर्धवट स्पीडब्रेकर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. आज दि २४ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील वडाची आळी परिसरातील मेट्रो मल्टी सर्विसेस समोर अशाच अर्धवट स्पीडब्रेकरमुळे अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.