डॉ. संपदा मुंडे यांचे शविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने का करण्यात आले नाही, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप
Beed, Beed | Oct 30, 2025 डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील चौकशीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माध्यमांसमोर बोलताना अंधारे म्हणाल्या की, “डॉक्टर संपदा मुंडे यांचे सविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने करण्यात आले नाही, तसेच तिचा भाऊ प्रमोद मुंडे यालाही तेथे थांबण्यास परवानगी देण्यात आली नाही. हे अत्यंत संशयास्पद असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय आम्हाला आहे.”