लोहा: किवळा येथे 25 वर्षीय तरूणाचा खुन;अज्ञात आरोपीने गळ्यावर, छातीवर मारून केली हत्या;सोनखेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
Loha, Nanded | Sep 27, 2025 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे किवळा येथे फिर्यादीचे जुने वाड्यात दि २५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री दहा ते दि २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सातच्या दरम्यान यातील फिर्यादीचा मयत मुलगा श्याम वसंत हंबर्डे वय २५ वर्षे यास अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी गळ्यावर, छातीवर मारून खुन केला. याप्रकरणी फिर्यादी वसंत हंबर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी सोनखेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे आज करीत आहेत.