मालेगाव: अतिवृष्टीमुळे मालेगावच्या 12 महसूल मंडळात 54 हजार 402 हेक्टर वरील पिके उध्वस्त.नुकसान भरपाईसाठी 46 कोटी 87 लाख लागणार
अतिवृष्टीमुळे मालेगावच्या 12 महसूल मंडळात 54 हजार 402 हेक्टर वरील पिके उध्वस्त.. नुकसान भरपाईसाठी 46 कोटी 87 लाख रुपयांची गरज.. ANC:-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव भागातील 12 महसूल मंडळात 121 गावातील 54 हजार 402 हेक्टर वरील पिके उध्वस्त झाली असून तब्ब्ल 87 हजार 111 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पंचनामे झाल्यानंतर महसूल विभागा तर्फे नुकसान भरपाई पोटी 46 कोटी 87 लाख रुपयांचा अहवाल काल दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाठविण्यात आला आहे