पलूस: आमणापूर, भिलवडी, बुर्लीसह अनेक गावांमध्ये पूरस्थिती बनली गंभीर ; नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे
Palus, Sangli | Aug 21, 2025 कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीला पूर आलेला आहे. परिणामी कृष्णाकाठावरील आमणापूर, भिलवडी, बुर्लीसह अनेक गावांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. आमणापूर पूल पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काही गावात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नदीकाठावरील वस्त्यांतील लोक स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करत आहेत. तर भिलवडी श्रीक्षेत्र औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. आमणापूर - अंकलखोप पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे खंडोबाचीवाडी, धनगावमार्