मोहोळ: पूरग्रस्तांना पंचनाम्यासाठी कागदपत्राची मागणी करू नये : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील
Mohol, Solapur | Sep 26, 2025 सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे अनेक कुटुंबांची घरे वाहून गेली आहेत. यामध्ये कुटुंबीयांची कागदपत्रे देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे पंचनामे करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतकरी तसेच कुटुंबीयांकडे कागदपत्राची मागणी करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत मागणी केली आहे.