निफाड: तालुक्यातील मौजे सुकेणे शिवारात अज्ञात चोरट्यांनी लांबवले एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोने
Niphad, Nashik | Mar 27, 2025 मौजे सुकेणे शिवारात अज्ञात चोरट्यांनी हातसफाई करत साफसफाई करण्यासाठी ताटात ठेवलेले एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातसफाई करत लांबवले असून कसबे सुकेने व ओझर पोलीस ठाण्यात याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती ओझर पोलिसांनी आज दिनांक 27 रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे. सदरची चोरी मौजे सुकेणे येथे दिनांक 26 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अनिता गणेश उगले यांनी फिर्याद दिली.