स्वीकृत नगरसेवकपदापासून पोटेंना रोखण्याच्या हालचाली श्रीगोंदा : नगरपरिषद निवडणुकीत मनोहर पोटे यांना रोखण्यात भाजपला यश आले असले, तरी मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास निम्मे नगरसेवक निवडुन आल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र, त्यांना सभागृहात एन्ट्रीच मिळू नये, यासाठी पोटे यांना रोखण्यासाठी विरोधकांची यंत्रणा कामाला लागल्याची चर्चा श्रीगोंदा शहरात आहे.