पनवेल महापालिका क्षेत्रातील धानसर गावामधील एका रेसॉर्ट चालकाने केलेल्या अश्लिल प्रकारामुळे त्याला पोलीसांनी अटक केली आहे. रिसॉर्टमध्ये विरंगुळ्यासाठी आलेल्या महिलांच्या ध्वनिचित्रफीत बनविण्यासाठी या रिसॉर्टचालकाने छुपा कॅमेरा स्वच्छतागृहात लावला होता. याबाबत संबंधित कुटुंबातील एका मुलाला संशय आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत ३५ वर्षीय रिसॉर्ट चालक मनोज चौधरी याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती आज सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास प्राप्त झाली.